मनातली वर्दळ

क़ॅनडा येथे अंतरराष्ट्रीय प्रदर्शन व्हायचे,त्या प्रदर्शनातले हे एक परकीय व्य़ंगचित्र. साध्या रेषांनी इथे एक माणसाचा आकार तयार झालेला आहे. हा माणूस धावतो आहे. याच आकाराच्या मध्ये आणखी एक आकार आहे, तो माणसाचाच आहे, तोही धावतोच आहे-मात्र उलट्या दिशेने धावतो आहे. त्याच्यातही एक माणूस-धावणारा;पण तो सुलट्या दिशेने…

शरीराच्या आकाराकडे थोडं थांबून ( म्हणजे आपण !) पाहिलं,की लक्षात येतं,हा एकच माणूस आहे. शरीराने एका दिशेने,तर मनाने दुसर्‍या दिशेने धावणारा. परस्पर विरोधी विचार-भावनांचा कल्लोळ बाळगून अस्थीर झालेला माणूस…आपण सर्वजण.

म्हटलं तर ही समस्या,म्हटलं तर ही प्रकृती. या स्थितीकडे गमतीनेही पहाता येतं आणि गांभीर्यानेही.स्वत:चे शेपूट चावत गोल गोल फिरणार्‍या कुत्र्यासारखा माणूस असतो,उलट सुलट धावणारा असंही म्हणता येतं आणि, माणसाला आयुष्यभर उसंतच नसते, तो निवांत राहूच शकत नाही असंही विषादाने वाटून जातं.

उत्तम व्यंगचित्राचं हेच तर लक्षण असतं. ते गंमतही करतं,अस्वस्थही करतं.

Please visit my other blog at http://jaanibemanzil.wordpress.com

Explore posts in the same categories: Uncategorized

2 प्रतिक्रिया on “मनातली वर्दळ”

  1. विद्या Says:

    ह्या माणसाचे डोळे/ डोळा का काढलेला नाही? कारण त्याने ते आत लावलेले आहेत.
    ह्याचं नाक एव्हढं मोठं का काढलेलं आहे? तो संवेदनशील आहे म्हणून??
    ह्याला हात का काढले नसावेत?

  2. Ranjeet Says:

    एखाद्या मॅरेज ब्युरो ने हे चित्र त्यांचा लोगो म्ह्णुन वापरायला कय ह्र्कत आहे ! सर्वच कारुण्यपुर्ण आहे.


यावर आपले मत नोंदवा